खासदार संजय जी जाधव साहेब यांनी जनार्दन महाराज बोचरे यांच्या वैद्यकीय उपचाराकरिता 51 हजाराची केली मदत

. औरंगाबाद जिल्ह्यातील ह.भ.प. श्री जनार्दन महाराज बोचरे हे गेल्या आठ दिवसापासून औरंगाबाद येथील दूत हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झालेले होते व दवाखान्याचे बिल हे आवाक्याच्या बाहेर निघण्याचे कळाले व परिस्थिती हलाखीची असल्यामुळे विश्व वारकरी सेनेतील महाराज मंडळींना माहिती कळविण्यात आली आणि लगेच सर्व वारकरी मंडळींनी आपापल्या परीने प्रयत्न चालू केले काही मंडळींनी आर्थिक स्वरूपात मदत केली पण दवाखान्याचे बिलाची रक्कम फार मोठी असल्यामुळे आर्थिक मदतही त्या पद्धतीची हवी होती म्हणून विश्व वारकरी सेना युवा राष्ट्रीय अध्यक्ष जगन्नाथ महाराज देशमुख यांनी पंढरपूरचे निष्ठावंत वारकरी परभणीचे खासदार माननीय संजय जी जाधव साहेब यांना सर्व माहिती दिली असता खासदार संजय जी जाधव साहेब यांनी स्वतः डॉक्टरांच्या सोबत संपर्क साधून 51 हजार रुपयाची मदत केली आणि त्यामुळे बोचरे परिवारा वरील आर्थिक ताण कमी झालेला आहे विश्व वारकरी सेना माननीय जाधव साहेब यांच्या उपकाराला कधीही विसरणार नाही खासदार साहेबांचे संघटनेच्यावतीने अरुण महाराज बुरघाटे, तुकाराम महाराज महाराज चवरे, जगन्नाथ महाराज देशमुख, गणेश महाराज शेटे संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जाहीर आभार मानले .