ताज्या घडामोडी

कत्तलीच्या च्या उद्देशाने नेण्यात येणाऱ्या गोवंशाच्या दोन वाहनांवर पोलिसांची कारवाई !!

  • कत्तलीच्या च्या उद्देशाने नेण्यात येणाऱ्या गोवंशाच्या दोन वाहनांवर पोलिसांची कारवाई !!
    • 16 गोवंशांना मिळाले जीवनदान !! ( वेदांत मुंदाने , अमरावती प्रतिनिधी ) नागपुर वरून अमरावती कडे कत्तलि च्या उद्देशाने नेण्यात येणार्‍या दोन पिकअप वाहनांमधून सोळा गोवंशाची पोलिसांकडून सुटका करण्यात आली .
      दिनांक 3 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास गोवंशाची वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांना अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील तळेगाव ठाकूर फाट्यानजीक आशीर्वाद बार जवळ पकडण्यात येऊन कारवाई करण्यात आली .
      गेल्या काही दिवसापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरून गोवंशांना कत्तलीच्या उद्देशाने निर्दयपणे वाहनांमध्ये कोंबून वाहतूक केल्या जात आहे . पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मालवाहू वाहनावर ताडपत्री टाकून जनावरांची तस्करी केल्या जाते . दिनांक 3 नोव्हेंबर मंगळवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास दोन वाहनातून नागपूरकडून अमरावती येथे कतली च्या उद्देशाने गोवंशांना दोन वाहनातून नेण्यात येत असताना . असताना त्यापैकी एक वाहन तळेगाव ठाकूर फाट्यानजीक आशीर्वाद बार जवळ नादुरुस्त झाल्याने रोडवर थांबले. वाहनात गोवंश असल्याचे काही नागरिकांना दिसतात त्यांनी तात्काळ तिवसा पोलिसांना माहिती दिल्याचे कळते . त्यावरून ताबडतोब पोलिसांनी दोन्ही वाहनांना पकडून कारवाई केली . त्यातील वाहन चालक मात्र फरार झाल्याचे कळते . या दोन्ही वाहनातून 16 गोवंशाची सुटका करून त्यांना जीवनदान देण्यात आले. तिवसा पोलिसांनी दोन्ही वाहने ताब्यात घेतली असून पुढील तपास तिवसा पोलिस स्टेशनच्या ठाणेदार रीता उईके यांच्या मार्गदर्शनात दीपक सोनाळकर करीत आहे ह्या कारवाईदरम्यान . भाजपा अध्यात्मिक समन्वय आघाडीचे सहसंयोजक रुपेश राऊत व अन्य नागरिक उपस्थित होते . वेदांत मुंदाने अमरावती प्रतिनिधी मो. नं. 98 81 52 84 79)
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: