ताज्या घडामोडी

अकोट ग्रामीण चे ठाणेदार श्री ज्ञानोबा फड साहेब यांना भागवत कथेमध्ये कोरोना योद्धा पुरस्कार

   

वरुर जऊळका ता अकोट जी अकोला येथे चालू असलेल्या भागवत कथेमध्ये अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार श्री ज्ञानोबा फड साहेब यांना भागवत कथा संमतीने आमंत्रित करून कोरोना काळामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी बजावल्या बद्दल आणि कर्तव्यदक्ष कर्तबगारीने पूर्ण अकोट तालुक्यातील नागरिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवले म्हणून आज कोरोना योद्धा पुरस्कार देण्यात आला व फड साहेबांच्या कडून गावकऱ्यांना कोरोणा बद्दल मार्गदर्शन करण्यात आले साहेबांनी भागवत कथेतील भाविकांना मार्गदर्शन करीत असताना सांगितले कोरोणा सोबत जीवन जगणे शिकावे लागेल लहान मुलांनी व वयोवृद्ध मंडळींनी विशेष करून कोरोणा संसर्गापासून बचावाचे प्रयत्न करायला हवेत कोरोना मुळे राजकीय ,सामाजिक ,धार्मिक क्षेत्रातील मोठमोठे मान्यवर मंडळी दगावले गेली हे आपण पाहिलेले आहे आणि म्हणून अजूनही आपण कोरोनाचे गांभीर्य लक्षात ठेवून जीवन जगायला पाहिजे . मी ही वारकरी संप्रदायाचा एक पाईप असून माझे पूर्ण घराणे वारकरी आहे.आज योग योगेश्वर संस्थान मधील भागवत कथा मंडपातील शिस्त पाहून मी भारावून गेलो आहे आणि वारकरी संप्रदाय आज शांतता व शिस्तप्रिय संप्रदाय आहे कारण पंढरपूरची वारी हा वारकऱ्यांचा प्राण आहे पण यावर्षी कोरोना मुळे आषाढी वारी होऊ शकली नाही.पण महाराष्ट्रातील सर्व वारकऱ्यांनी समजूतदारपणा दाखवला कोणीही वारी झालीच पाहिजे म्हणून रस्त्यावर उतरले नाही आंदोलन केले नाही हे एक प्रकारे शासनाला व सरकारला फार मोठे सहकार्य केलेले आहे पोलीस हा समाजाचा मित्र आहे आज गणेश महाराज शेटे यांनी माझा सत्कार केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे असे उद्गार साहेबांनी काढले आमचे आयुष्यभर वारकरी संप्रदायाला असेच सहकार्य राहील अशी साहेबानी ग्वाही दिली . साहेबांचा सत्कार करतेवेळी रतन पाटील वानखेडे,बच्चु पाटील वानखेडे, विनोद ईसेकार,पिंन्टु भाऊ वानखडे सुखदेव नांदेकार, विलास म कराळ,विक्रम म शेटे, सोपान म ऊकर्डे,सागर म गायकवाड, गजानन मोडक, किशोर बुटे,कुमार बुटे,प्रविन शेटे,रवी शेटे हि मंडळी उपस्थित होती

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: