राज ठाकरे घेणार राज्यपालांची भेट, कृष्णकुंजवरुन रवाना

वीज बिल, दूध दर, मंदिरं तसंच अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्याची शक्यता
October 29, 2020 10:14 am
मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. भेटीसीठी राज ठाकरे आपलं निवासस्थान कृष्णकुंजवरुन रवाना झाले आहेत. राज ठाकरे राज्यपालांची भेट घेण्यामागील कारण सांगण्यात आलेलं नाही. मात्र यावेळी राज ठाकरे वाढीव वीज बिल, दूध दर, मंदिरं तसंच अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्याची शक्यता आहे. लॉकडाउनच्या काळात आपली व्यथा मांडण्यासाठी अनेक संघटनांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यातील अनेक मुद्दे राज ठाकरे राज्यपालांसमोर मांडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रातून राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाची आठवण करुन दिली होती. याशिवायही लॉकडानमध्ये राजभवनावर भेटीसाठी येणाऱ्या राजकारणी आणि सेलिब्रेटींमुळे राज्यपाल नेहमी चर्चेत राहिले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राज ठाकरे राज्यपालांच्या भेटीला पोहोचणार आहेत. त्यामुळे या भेटीकडे लक्ष लागलं आहे .
मंगेश थोरात
मुंबई शहर
प्रतिनिधी