ताज्या घडामोडी

शेतमालाला हमी भाव नाही,योजनेचा लाभ नाही

अंकित क-हे

बाळापूर तालुका प्रतिनिधी

मो.9579716578

बाळापूर तालूक्यातील नया अंदूरा गावातील शेतकऱ्यांना पडला आरोग्य पेच तो पुढील प्रमाणे प्रकाशित करण्यात आला आहे बाळापूर तालूक्यातील शेतकऱ्यांना योजनेचा लाभ नाही व शेतमालाला हमी नाही त्यामुळे बाळापूर तालूक्यातील शेतकऱी आर्थिक संकटात सापडलेला आहे येथील शेतकऱ्यांना(१) आजपर्यंत गेल्या दोन वर्षापासून पिएम किसन सन्मान योजनेचा लाभ नाही(२) मागील वर्षाचा अल्प दरात काही शेतकऱ्यांना पीक विमा व काही शेतकऱ्यांना अजिबात नाही (३) दुष्काळ मदत अजूनही जमा झाली नाही (४) मागील वर्षी कपाशी पीकावर आलेल्या बोंडअळीचे पैसे मिळाले नाव (५) मागील वर्षी बाळापूर तालूक्यात अोला दुष्काळ जाहीर करण्यात आला होता परंतु त्याचा निधी सुद्धा मिळाला नाही (६) शेतकऱ्यांना कर्ज माफी योजनेचा लाभ नाही अशा प्रकारे शेतकऱ्यांना योजनेचा लाभ ना व त्यांच्या शेतमालाला हमी सुद्धा नाही आहे . त्यामुळे आत्महत्या दिवसेदिवस शेतकरी आत्महत्या प्रमाण वाढतच आहे तसेच शेतकऱ्यांना बॅंकेतील घेतलेले कर्ज अर्धवट माफ झाल्यामुळे शेतकरी निराश होतो अस्मानी सुलतान समकटानी तो त्रस्त आहे नैसर्गिक आपत्ती बरोबर शेतमालाला योग्य हमी मिळत नाही त्यामुळे आर्थिक संकटातून सुटका कधी व कशी होणार असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.खरीप हंगामातील यावर्षी पावसाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे मुंग, उडीद, सोयाबीन, आणि ज्यारी, कपाशी, पिकाचे मोठे नुकसान झाले होते यामुळे शेतकरी आर्थिक कचाट्यात सापडला आहे आता रब्बी हंगामातील हरभरा पिकापासून शेतकऱ्यांना मोठ्या उत्पादनाची अपेक्षा करीत परंतु हरभरा पेरणी करण्यासाठी हरभर्याची बी जास्त भावाने उपलब्ध आहे व कपाशी पीकावर बोंडअळीचे आक्रमण झाल्याने शेतकऱ्यांच्या जवळील आलेला कापूस अल्प दरात मागणी होत आहे पण शेतकऱ्यांना हमी भाव मिळेपर्यंत शेतकऱ्यांनी आपल्या घरात आलेला शेतमालाला विक्री केल्याशिवाय प्रर्याय नाही त्यामुळे शेतकरी आर्थिक बाबींवर मात अशी करणार आसा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे व शेतकऱ्यांना आर्थिक पेच पडला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटात सापडला आहे . नया अंदूरा गावातील शेतकरीआजपर्यंत शेतकऱ्यांना कमीत कमी योजनेचा लाभ मिळाला व तोही अर्धवट मिळाला आहे तो म्हणजे असा की काही शेतकऱ्यांना पीक विमा बोंडअळीचे पैसे दुष्काळ नीधी काही लोकांना पिएम किसान योजनेचा लाभ मिळाला परंतु मला गत एक वर्षापासून अजूनही पिएम किसान योजनेचा लाभ मिळालेला नाही, (शेतकरी भास्कर क-हे नया अंदूरा)नया अंदूरा शेत शिवारात कपाशी पीकावर बोंडअळीचे आक्रमण झाल्याने नया अंदूरा गावातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे त्यांना तातडीने नया अंदूरा शेत शिवारात बोंडअळीचा सर्वे करून तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी व्यक्त केली जात आहे
(शेतकरी सत्यम झाडे नया अंदूरा).शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष.बाळापूर तालूक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक संकट पडले आहे बाळापूर तालूक्यातील शेतकऱ्यांनचे हातात तोंडाशीवर आलेले पीक अवकाळी पावसाने हिसकावले असून बाळापूर तालूक्यातील शेतकऱ्यांना गत एक वर्षापासून अजूनही वंचित असलेल्या योजनेचा लाभ त्वरित देण्यात यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अकोला जिल्हा अध्यक्ष गणेश खुमकर करीत आहेत
( गणेश खुमकर हाता)
जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा निंबा यांनी परीसरातील शेतकऱ्यांची फसवणूक करून परस्पर पुनरर्गठन केल्याने परिसरातील शेतकर्यांना आर्थिक संकट पडले आहे जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा निंबा यांनी केवळ अल्पभूधारक शेतकऱ्यांवर अन्याय केलेला आहे बाकी मोठमोठ्या शेतकऱ्यांना संपुर्ण २ लाखापर्यंत कर्ज माफी दिली परंतु ५ एकर पर्यंत असलेल्या शेतकऱ्यांनचा विश्वास घात करून त्यांना पुनरर्गठन मध्ये अडकून त्यांची आर्थिक फसवणूक केली आहे त्यांना तातडीने न्याय द्यावा अन्यथा पुनरर्गठन झालेल्या शेतकऱ्यांनचे बाळापूर तालूक्यात तिव्र आंदोलन होणार असल्याचे समोर आले आहे.जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा निंबा यांनी कुठल्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता लवकरात लवकर पुनरर्गठन झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून न दिल्याने शेतकऱ्यांना घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अकोला जिल्हा अध्यक्ष गणेश खुमकर शेतकऱ्यांनच्या सोबत तिव्र आंदोलनात सहभागी होणार असल्याची बातमी समोर आली आहे बाळापूर तालूक्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर सर्व बाकी असलेल्या योजनांचा सुध्दा लाभ मिळाला पाहिजे अशी मागणी बाळापूर तालूक्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: