ताज्या घडामोडी

संताची माहिती मिरपूर लोहारे यात्रा उत्सव विजयादशमी


चैतन्य आवजीनाथ महाराजानी गुरु आदेशानुसार मिरपूर लोहारे या ठिकाणी अश्विन शुद्व विजयादशमी या महान दिवशी संजीवन समाघी घेतली तेव्हा पासुन प्रत्येक विजयादशमीच्या दिवशी या ठिकाणी भव्य यात्रा भरते
दासरा यात्रा उत्सव > मिरपूर लोहारे परिसरातील हजारो नाथभक्त श्री क्षेत्र कोपरगाव येथुन गंगेचे पवित्र पाणी कावडीने अनवाणी घेऊन येतात कावडीचे प्रवित्र पाणी गावातुन गाजत ढोलताशाच्या गजरात मिरवणुक काढली जाते पवित्र पाण्याने मंदिरातील पूजारी बारा वाजता आवजीनाथ समाधीस महास्नान घालतात दही . दुध तुपानेही स्नान घालुन नंतर नवीन पंचागाचे वाचन केले जाते.
अश्विन शुध्द विजयादशमीला > आवजीनाथ बाबा यांच्या देवकाठीची वाजतगाजत मिरवणुक काढून आवजीनाथांची बहिण देमाईमाता व लक्ष्मीआई यांच्या मंदिरांना काठी भेटविली जाते व पुन्हा आवजीनाथ बाबा यांच्या मंदिरापुढे या काठीची प्रतिष्ठापना केली जाते
आवजीनाथ युवक मंडळ पंचवटी नाशिक यांचे तफै व भक्तगणाचा माध्यातुन करण्यात येणाऱ्या भंडाऱ्याचा भक्तगण मोठ्या प्रमाणात लाभ घेतात व हा महाप्रसाद मिळविण्यासाठी नाथभक्तची झुंबङ उडते
यात्रा कालवधीच्या दोन दिवस अदोगर थेट कळसा पासुन मुख्य मंदिराचा गाभाऱ्या परंत रोषणाई केली जाते आवजीनाथ मुर्तीस स्नान घालुन स्वच्छ केले जाते समाधीस पंचामृताने महास्नान घालून पुजा करतात व मलीदा गुळ , तुप याचा नैवेद्य दाखवतात
या यात्राचे विशेष म्हणजे अठरापगड जाती जमाती चे लोक मोठ्या श्रध्दने या यात्रात समाली होतात . व नवसाचा फुलोरा या माध्यमातुन आवजीनाथाला गारान घालतात म्हणजे नाथभक्त पेटलेल्या विस्तवाच्या निखाऱ्यावर चालत जाऊन आपला नवस बोलतात आणि फेडतात. या फुलोऱ्याचे सत्य असे आहे की फूलोरा चालतांना कुठल्याही प्रकारच्या वेदना होत नाहीत व
बोलेले नवस पुर्ण होतात अशी प्रचिती नाथ भक्तला येत आहे नवसाला पावणारा देव म्हणून आवजीनाथची ख्याती प्रसिद्ध होत चालली आहे दरवर्षि यात्रेला लाखो भाविकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे .
यात्रा कालावधी मध्ये दरवर्षि प्रमाणे दुकानदार आपले प्रसादचे दुकाने लावतात. व प्रसाद म्हणुन कोल्हाची रेवडी येथे प्रसिद्ध आहे नाथभक्त प्रसाद म्हणुन रेवडी खरेदी करतात या कालावधी मध्ये लाखो रुपयांची उलाढाल होती. व मिरपूर लोहारे यात्रे मध्ये शौकीन भक्तासाठी नामवंत कालाकराचे सांस्कृतिक कार्यक्रम होतात. या कार्यक्रमचा आनंदाचा लाभ घेणासाठी येथे मोठया प्रमाणात भक्ताची झुंबड उङते
आवजीनाथ महाराजच्या यात्रेत 5 ते 6 लाख नाथभक्तचा समावेश असतो उद. मंबई. नाशिक . अहमदनगर.पुणे . बीड. अकोला. जालना या भागतुन लोक मोठया श्रद्धने समील होतात.

         जय बाबा कानिफनाथजी

. जय बाबा आवजीनाथजी
आदेश नाथांचा

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: