मौजे जांब (बु.) येथे तब्बल 4 लाख 76 हजार 500 रुपयाचा गुटखा जप्त नव्या पोलीस निरीक्षकाची गुटखा विक्रेत्याच्या विरोधात धाडसी कारवाई.

मौजे जांब (बु.) येथे तब्बल 4 लाख 76 हजार 500 रुपयाचा गुटखा जप्त
नव्या पोलीस निरीक्षकाची गुटखा विक्रेत्याच्या विरोधात धाडसी कारवाई.
संग्राम पाटील तांदळीकर
मुखेड तालुका प्रतिनिधी
@ तब्बल वर्ष भरानंतर पोलिसाच्या कारवाईने अवैध धंदेवाल्यांची झोप उडाली
@ पोउनि गजानन काळे व मपोउनि अनिता इटूबोने यांची संयुक्त कारवाई
@ अवैध धंद्यांविरोधात नव्या पोलीस निरीक्षकाचे बंड
@ गुटखा विक्रेत्याच्या विरोधात सर्वात मोठी कारवाई
मुखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अवैध मार्गाने अवैधरीत्या गुटखा विक्री सुरु असल्याची कूनकून पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांना लागताच मुखेडचे नवे पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, पोलीस उपनिरीक्षक गजानन काळे व महिला पोलीस उपनिरीक्षक अनिता इटूबोने यांनी धाड टाकून मौ. जांब येथे दि. 20 फेब्रुवारी रोजी राऊतवाड कॉम्प्लेक्स मधील यश अंडा सेंटर व कन्फेक्श्नरी दुकानात दोन व्यक्ती विनापरवाना अवैध रित्या 4 लाख 76 हजार 500 रुपयाचा गुटखा जप्त केला त्यामुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहे.
मागील काळात मुखेड शहर व परिसरात अवैध मार्गाचे अवैध धंदे राजोरासपणे सुरु होते त्यावर कुठल्याही प्रकारची तत्कालीन पोलीस निरीक्षकाने कारवाई न करता अवैध धंदे वाल्या सोबत हातमिळवणी करून आपले चांगभले करून घेण्यात धन्यता मानली होती पण पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे व पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांनी पदभार घेताच अवैध धंद्याविरोधात धाडी सत्र चालवल्यामुळे अवैध धंदे वाल्याविरोधात बंड केल्याने अवैध धंदेवाले थंड होणार असल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे.
विनापरवाना गुटखा साठवणे व चोरट्या मार्गाने विक्री करणे हा कायदेशीर गुन्हा असल्यामुळे अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्यावर मुखेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे,पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजानन काळे हे करीत आहेत