ताज्या घडामोडी

अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त ज्वारी हरभरा व रब्बी पिकांची माहिती विमा कंपनी, कृषी विभागास कळवा’: बालाजी पाटील ढोसणे यांचे शेतकर्‍यांना आवाहन…

अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त ज्वारी हरभरा व रब्बी पिकांची माहिती विमा कंपनी, कृषी विभागास कळवा’: बालाजी पाटील ढोसणे यांचे शेतकर्‍यांना आवाहन…
देगलूर तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार
मुखेड पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत रब्बी पिकासाठी ज्वारी,हरभरा व रब्बी पिकांची विमा संरक्षण घेतलेल्या, पावसाने ज्वारी हरभरा व अन्य रब्बी पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती पीक विमा दाव्यासाठी कृषी विभाग तसेच विमा कंपनीस  तत्काळ कळवावी, असे आवाहन शेतकरी पुञ बालाजी पाटील ढोसणे यांनी केले.

सध्या हरभरा पिक बहरात असुन काही ठिकाणी काढणी अंतिम टप्प्यात आहे.व ज्वारीचे पण अवकाळी पावसाने नुकसान झाले काही शेतकऱ्यांनी हरभरा कापणी करुन गोळा न करता शेतात ठेवली आहे. पावसामुळे हे हरभरा भिजले असल्यास पीकविमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांना काढणीपश्‍चात नुकसान भरपाईसाठी पीक विमा परतावा मिळू शकतो. त्यासाठी पीक विम्यासाठी हरभरा,ज्वारी अधिसूचित क्षेत्रातील शेतात हरभरा कापणी करुन पसरून ठेवलेल्या ठिकाणी कापणीपासून १४ दिवसांत गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे पडलेला पाऊस, अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसानीस ग्राह्य धरता येतात.
यासाठी शेतकऱ्यांनी ही घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत याबाबतची सूचना इफको टोकीयो पीक विमा कंपनी किंवा कृषी विभागास देणे बंधनकारक आहे. 
नुकसान काळविताना सर्वे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्र तपशील कळविणे अनिवार्य आहे. प्राप्त झालेल्या सुचनेनंतर संयुक्त समिती शेतकऱ्याच्या नुकसान झालेल्या क्षेत्राची पहाणी करेल. या मध्ये विमा कंपनी प्रतिनिधी, कृषी अधिकारी व संबंधित शेतकऱ्यांचा समावेश असेल.
पहाणीनंतर नुकसानीचा अहवाल १० दिवसांत सादर करण्यात येईल. त्यादृष्टीने बाधित शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअर वरून crop insurance हे ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये आपल्या नुकसानीची माहिती द्यावी किंवा १८००१०३५४९०  या टोल फ्री क्रमांकावर किंवा  supportagri@iffcotokio.co.in या ई-मेल वर किंवा कृषी विभागाच्या कार्यालयात अर्ज करून कळवावे, असे आवाहन बालाजी ढोसणे,बालाजी पाटील सांगवीकर,रमाकांत पाटील जाहुरकर,माधव पा.खदगावे,मन्मथ खंकरे,निळकंठ पा.कोळनुरकर यांनी केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: