ताज्या घडामोडी
जितापुर व शिवपुर येथे जी.प.सदस्य प्रकाश आतकड यांचे हस्ते भूमिपूजन…

जितापुर व शिवपुर येथे जी.प.सदस्य प्रकाश आतकड यांचे हस्ते भूमिपूजन…..
देवानंद खिरकर = अकोट तालुक्यातील उमरा सर्कल मधिल शिवपुर येथे दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत 12 लाख रुपये निधि समाज मंदिर बांधकाम,रस्ता व नाली बांधकामा करिता मंजूर झाले आहेत.तरी प्रकाश आतकड यांचे हस्ते आज भूमिपूजन करण्यात आले आहे.यावेळी उमरा सर्कल जिल्हा परिषद सदस्य प्रकाश पाटील आतकड,शिवपुरचे सरपंच किशोर पाटिल बोंद्रे,देवकृष्ण पाटील महल्ले,दिगांबर तायडे,गणेश रोहनकार,मनोहर चेडे,व गावातिल मंडळी हजर होती.तर जितापुर ते करी रोडचे सुध्दा जी.प.सदस्य प्रकाश पाटील आतकड यन्चे हस्ते भूमिपूजन करण्यात आले यावेळी पंचायत समिती सदस्य राजूभाऊ येऊल,पं.स.सदस्य राधाबाई काळे,सरपंच विठ्ठल मंगळे,सोनाजी बारे,व गावातील मंडळी हजर होती.रोडची किंमत 99.99 लाख रुपये आहे.
Shortlink http://punyabhuminews.co.in/?p=2904