ताज्या घडामोडी
वै.ह भ प गुरुवर्य जगन्नाथ महाराज वसु यांचे आज द्वितीय पुण्यस्मरण

संपादक -गणेश महाराज शेटे
वै. ह भ प श्री जगन्नाथ महाराज वसु यांचा अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यामध्ये संतांच्या पदस्पर्शाने पुनित झालेले नेव्हरी गाव इथे महाराजांचा जन्म झाला लहानपणा पासूनच महाराजांना भजन कीर्तनाची गोडी होती. सोज्वळ स्वभाव, वारकरी संप्रदायातील अभ्यासू व्यक्तिमत्व, सुप्रसिद्ध किर्तनकार, व्यवहार चातुर्य आणि गायन क्षेत्रामध्ये विशिष्ट शैलीत गायन करण्यात महाराज प्रसिद्ध होते जीवनामध्ये महाराजांनी कुणाचेही अंतकरण दुखताना मी कधीच पाहिलेला नाही महाराजांचे दोन वर्षाच्या आधी अल्पशा आजाराने निधन झाले असून तेव्हापासून वारकरी संप्रदाय मध्ये गायन क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी आणि वारकरी सांप्रदाय मधे असणारे एक विशिष्ट व्यक्तिमत्त्व हरवल्याचे दुःख सर्व वारकरी संप्रदायातील साधक मंडळींच्या मनातून अजूनही गेलेले दिसत नाही आणि भविष्यात जाणार सुद्धा नाही पण महाराजांचे सुपुत्र ह भ प ज्ञाने रतन महाराज वसु ,रतन महाराज वसु व त्यांच्या सोबतीला त्यांचे बंधू महाराजांची परंपरा तंतोतंत रीत्या सांभाळण्याचे कार्य करीत आहेत अशा या थोर संत महात्म्याचे आज द्वितीय पुण्यस्मरण सोहळ्याच्या निमित्ताने पूर्ण वारकरी संप्रदायाच्या वतीने द्वितीय पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त भावपूर्ण आदरांजली समर्पित करतो
Shortlink http://punyabhuminews.co.in/?p=288