ताज्या घडामोडी

समृद्ध गाव स्पर्धेत सहभागी होऊन गावे पाणीदार व समृद्ध करा ।।

समृद्ध गाव स्पर्धेत सहभागी होऊन गावे पाणीदार व समृद्ध करा ।।

मा. हरिष भाऊ पिंपळे (आमदार) साहेब
*
आज दिनांक 10.02.2021 रोजी महाराष्ट्र शासन व पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने समृद्धता स्पर्धा कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी मा. जितेंद्र पापळकर साहेब (जिल्हाधिकारी) होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून मा. हरीश भाऊ पिंपळे (आमदार) साहेब मुर्तीजापुर, मा. बाबासाहेब गाढवे सर (उपजिल्हाधिकारी) रोजगार हमी योजना जिल्हाधिकार्यालय अकोला, प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. नामदेव ननावरे पाणी फाउंडेशन मुंबई तथा माजी मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष नानवटे उपस्थित होते यावेळी मा जितेंद्र पापळकर जिल्हाधिकारी अकोला यांनी उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी यांना पाणी फाउंडेशन च्या समृद्ध गाव स्पर्धेत सहभागी गाव आहेत या गावांमध्ये तातडीने सर्वेक्षण करण्या बाबत मार्गदर्शन केले.
मा. हरिष भाऊ पिंपळे आमदार साहेब यांनी वॉटर कप स्पर्धेत केलेल्या कामाचा फायदा आज बार्शीटाकळी तालुक्यातील गावात दिसत आहे या गावाने वॉटर कप स्पर्धेमध्ये भाग घेतला त्या गावांमध्ये कमालीची जलसंधारणाची कामे स्पर्धेच्या माध्यमातून झालेली आहेत तालुका हिरवेगार पाणीदार करण्याचा पाणी फाउंडेशन ने केलेला आहे त्यामुळे सर्व अधिकारी कर्मचारी यांना सूचना आहेत की समृद्ध गाव स्पर्धेमध्ये आपला वेळ देऊन या स्पर्धेमध्ये जे सर्वेक्षण करायच आहे ते सर्व टीमने करावे याबाबत मार्गदर्शन केले.
मा. बाबासाहेब गाढवे सर (उपजिल्हाधिकारी रोजगार हमी योजना) यानी समृद्ध गाव स्पर्धेमधून आपलं गाव समृद्ध करण्यासाठी सविस्तरपणे मार्गदर्शन केले.
तसेच सर्व स्तरावरील सर्वेक्षण करण्यासाठी मा. ननावरे यांनी यांनी उपस्थित अधिकारी कर्मचारी यांना समृद्ध गाव स्पर्धे बाबत करायचे कामे व समृद्ध का स्पर्धेचा पहिला टप्पा पूर्ण करणाऱ्या गावांचा सन्मान याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले मार्गदर्शन केले.
सुभाष नानोटे विभागीय समन्वयक यांनी विहीर पाणी पातळी अहवाल वाचन केले मोजमाप केल्यामुळे गावात किती पाणी आहे याचे फायदे काय याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला उपस्थित अकोट व बार्शीटाकळी चे तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, संघपाल वाहूरवाघ,विद्या आकोडे, मनीष महल्ले, जीवन गावंडे तालुका समन्वयक, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, ग्राम रोजगार सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. कार्यशाळेचे सूत्रसंचालन संघपाल वाहुरवाघ यांनी केले तर आभार जीवन गावंडे यांनी मानले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: