सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीची निवड …

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीची निवड …
अध्यक्ष किशोर बापू देशमुख कार्याध्यक्षपदी चेतन देवळे
शहर प्रतिनिधी आकोट.
देवानंद पाटील खिरकर = शहरातील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असुन समितीच्या अध्यक्षपदी किशोर बापू देशमुख तर कार्यध्यक्षपदी चेतन देवळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. येत्या 19 फेब्रुवारी रोजी शहरात पारंपारिक रित्या सार्वजनिक शिवजयंती उत्सव साजरा होणार असून समितीद्वारा विविध कार्यक्रम राबविण्यात येणार असून शिवप्रेमी युवकांनद्वारा भव्यदिव्य पणे उत्सव साजरा करण्याचा मानस आहे. याबाबत मोठे बारगण शिवाजीनगर येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती प्रतिमेला पूजन करण्यात आले तसेच आयोध्या प्रति प्रभू श्रीरामचंद्र यांच्या प्रतिमेस हारार्पण करण्यात आले.या बैठकीला असंख्य शिवप्रेमी युवकांचा सहभाग होता तसेच या बैठकीत आजी माझी पदाधिकारी शिवप्रेमी युवक हजर होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अवि गावंडे तर आभार प्रदर्शन सागर उकर्डे यांनी केले.तसेच मार्गदर्शन राजेश काका नागमते,संजीव गोरे यांनी केले. या बैठकीतील घोषणेनुसार नूतन कार्यकारिणीमध्ये खालील समिती स्थापन करण्यात आली.
शिवजयंती उत्सव समिती व अकोट मार्गदर्शन समिती पदी
संजय गोरे, राजेश नागमते,अवि गावंडे, श्रीजीत कराळे, सागर उकंडे, मयूर शिंगनारे, विशाल भगत, प्रतीक गोरे, संदीप कुलट, ब्रम्हकुमार पांडे, सचिन शिंदे, देवानंद माळी, चेतन मर्दाने, मनोज झाडे, प्रशांत भगत, मंगेश चिखले, सागर बोरोडे, सतिष हांडे, लक्ष्मण शिंगणे, आनंता मिसाळ, प्रसन्न जवंजाळ.
अध्यक्षपदी किशोर देशमुख, कार्याध्यक्षपदी चेतन देवळे, उपाध्यक्ष मुकुंद नागमते, गौरव महल्ले, अभिलाष निचळ, अक्षय घायल., सचिवपदी गोपाल पेढेकर, रितेश पाचकोर, मंगेश राणे, शुभम काटे., कोषाध्यक्षपदी प्रदीप कदम., प्रसिद्धीप्रमुखपदी अक्षय पाटील जायले, सह प्रसिद्धीप्रमुख गजानन चौधरी., सदस्यपदी आचल बेलसरे, रितेश हाडोळे, चेतन थोरात, ऋषी बेराड, कुणाल कुलट, बजरंग मिसळे, चेतन गुरेकार, गोपाल मोहोड, अजय गवळी, प्रणव टवले, ओम शेटे, सोपान गहले, अक्षय नाचणे, श्रीकांत साबळे, नारायण शिंगनारे, अमित काळे, पियुष बाळापुरे, आकाश निंबोकार, ऋषी लिल्हारे, नितेश फुरसुले, विशाल निचळ, रॉकी वाघमारे, विलास बोडखे या सदस्यांची निवड करण्यात आली.