ताज्या घडामोडी
पादुका संस्थान मूंडगाव येथे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

श्री दि 21/1/2021 :- श्री गजानन महाराज पादुका संस्थान मूंडगाव येथे डॉ निखिल धांडे, अकोट यांचे निशुल्क आरोग्य तपासणी शिबीर पार पडले महाराज हयात असतांना पासून चालत आलेली यात्रेची प्रथा कोरोना महामारी मुळे या वर्षी काहीसा बदल करून ही प्रथा सुरू ठेवायचे श्री गजानन महाराज पादुका संस्थांचे विश्वस्त मंडळाने ठरविले आहे.. यात्रेच्या पहिल्या दिवशी म्हणजे 21/01/2021 ला डॉ. निखिल धांडे यांच्या कडून मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले यात रुग्णांची हृदय रोग, मधुमेह, थाईराॅइड, व इतर तपासणी व मार्गदर्शन केले गेले. शिबिराचा शेकळो गरजू रुग्णांनी लाभ घेतला.विश्वस्त मंडळाकडून डॉ निखिल धांडे व त्यांंच्ये सहाय्यक डॉ रविंद्र पारस्कर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
त्यावेळी मंदिराचे विश्वस्त व गावातील काही मान्यवर उपस्थित होते.
Shortlink http://punyabhuminews.co.in/?p=2620