जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटणकर यांच्याकडून करण्यात आली वाळू माफिया वर कार्यवाही..

जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटणकर यांच्याकडून करण्यात आली वाळू माफिया वर कार्यवाही..
मनोज बिरादार देगलूर प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या काठावर बुधवारी 13 जानेवारी रोजी रात्री जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटणकर साहेब स्वतः उपस्थित राहून वाळू माफिया वर धाडसी कारवाई करत 20 वाहने जप्त केली आहेत. यावेळी त्यांच्यासह नांदेडचे उपजिल्हाधिकारी लतीफ पठाण सर यांच्यासह नायब तहसीलदार मंडळ अधिकारी तलाठी पोलीस अधिकारी उपस्थित होते. बुधवारी संध्याकाळी 6 वाजता सुरू केलेली ही कार्यवाही रात्री 10 वाजेपर्यंत सुरु होती. नांदेड जिल्ह्यात गोदावरी पैनगंगा मांजरा लेंडी मन्याड आसना या प्रमुख नद्यांसह इतरही नद्या आहेत. यातील वाळू उपसा करण्यासाठी सातत्याने वाळूमाफिया कडून प्रयत्न होत असतात. जिल्हा प्रशासनाच्या वतीने याबाबत महसूल प्रशासनाच्या पथकाद्वारे कार्यवाही ही करण्यात येत असते.मध्यंतरीच्या काळात वाळूमाफियांनी बिहार राज्यातून मजूर मागून रात्रीच्या वेळी अवैध वाळू उपसा सुरू केला होता. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटणकर साहेबांनी आक्रमक भूमिका घेत कार्यवाही केल्या होत्या. तराफे नष्ट करून ते जाळण्यात आले होते. तसेच वाहने वाळू जप्ती सोबतच वाळू माफिया वर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे मध्यंतरीच्या काळात वाळू उपशाचे प्रमाण कमी झाले होते.