ताज्या घडामोडी

मुखेड तालुक्यातील दुष्काळी अनुदान दोन टप्प्या ऐवजी एका टप्प्यात वाटप करा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष शिव शंकर पाटील कलंबर कर यांची निवेदनाद्वारे मागणी.


मनोज बिरादार देगलूर प्रतिनिधी
मुखेड तालुक्यात सध्या दुष्काळी अनुदान वाटप करण्यात येत असून या दुष्काळी अनुदान वाटप दोन टप्पे ऐवजी एका टप्प्यात अनुदान वाटप करण्यात यावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष श्री शिव शंकर पाटील कलंबर कर यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांचे अनुदान मंजूर करताना शेतकऱ्यावर अन्याय केला आहे. शेतकऱ्यांना सरसकट अनुदान हेक्टरी 25 हजार रुपयांची मागणी प्रतिहेक्‍टरी असताना शेतकऱ्यांना 10 हजार रुपये प्रति हेक्‍टरी तुटपुंजी रक्कम मंजूर करून सरकारने शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली आहे त्यात एक हजार रुपयांची नुकसान भरपाई टक्केवारी कमी दाखवून त्यात पैसे कमी केले आहे. शेतकऱ्यावर जणू अन्याय केलेला आहे. शेतकऱ्यांना तुटपुंजी रक्कम अनुदान मंजूर करून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. अतोनात नुकसान होऊन शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक फटका बसला आहे. शेतकऱ्यांना एकरकमी अनुदान वाटप करताना बँकेला एक वर्षाचा कालावधी घेताहेत अनुदान वाटप करत असताना एक वर्षाचा कालावधी घेऊनही शेतकऱ्यांना बँकेचे चकरा माराव्या लागत आहेत. ही दुष्काळ अनुदान वाटप करण्यासाठी आता दोन वर्षे तरी लागतील असे सर्व शेतकऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया बोलली जात आहे. म्हणून शेतकऱ्यांच्या अनुदान वाटप एक टप्प्यात द्या. अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवाजिल्हाध्यक्ष श्री शिव शंकर पाटील कलंबर कर यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदार श्री काशिनाथ पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: