ताज्या घडामोडी

नवयुवक नवदुर्गा महोस्तव मंडळातर्फे रक्तदान शिबिर….. नारीशक्तिने केलेले रक्तदान एक प्रशंसनीय उपक्रम ,ठाणेदार फड साहेब….

अकोट तालुका प्रतिनिधी – देवानंद खिरकर

नवयुवक नवदुर्गा महोत्सव मंडळातर्फे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सूद्धा रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रक्ताचा तुटवडा जाणवत आहे.त्याअनुसंगाने एक सामाजिक भान ठेवुन हाती घेतलेला उपक्रमामध्ये स्त्री पुरूष मिळून 60 रक्तादात्यांनी रक्तदान केले.नवयुवक नवदुर्गा मंडळातर्फे आयोजीत रक्तदान शिबीराचे अकोट ग्रामीणचे ठाणेदार फड साहेबांनी भरभरुन प्रशंसा केली.अशा महामारीच्या परीस्थितित रक्तादान शिबीर घेऊन सामाजिक उपक्रम हाती घेतला.असे राजेश नागमते यांनी याप्रंसगी काढले.रक्तदान शिबीराचे उदघाटक म्हणुन आकोट ग्रामीण पो.स्टे चे ठाणेदार फड साहेब,प्रमुख पाहुणे,जि.प.सदस्य गजानन डाफे,प्रकाश आतकड,बोर्डी ग्रा.पं.प्रशासक घुगे साहेब,विस्तार अधिकारी पं स.अकोट ,ग्रामसेवक मोहोकार,तसेच प्रमुख उपस्थिति राजेश नागमते,माजी सरपंच सुभाष खिरकर,संजय ताडे,काशिनाथ कोंडे सुरज शेंडोकार तसेच मंडळाचे अध्यक्ष रमेश गुरेकार,सुखदेव मासोदकार,चेतन गूरेकार,दीपक अंबळकार,शाम लटकुटे,नरेंद्र कोंडे अमोल लटकुटे, माणिक गुरेकार,प्रशांत डवंगे वैभव भगत.अक्षय डवंगे.लखन गुरेकार गोलु रामेकर अतुल लटकुटे, श्री राम भामोदकार,विनोद मारोटकार नितीन गुरेकार, स्वप्नील मासोदकार तसेच ठाकरे रक्तपेढीचे डाँ.मोहंम्मद साहेब यांची उपस्थिति होती .सूत्रसंचालन पवन गुरेकार यांनी तर आभारप्रदर्शन नरेंन्द्र कोंडे यांनी मानले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: