गोदावरी मनार पब्लिक स्कूल मध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

गोदावरी मनार पब्लिक स्कूल मध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.
रामतिर्थ प्रतिनिधी शामसुंदर जाधव
शंकरनगर – येथील गोदावरी मनार पब्लिक स्कूल, शंकरनगर येथील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेमध्ये क्रांतीज्योती पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
तत्पूर्वी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डी.पी.पांडेय व प्रमुख पाहुणे तारा तिवारी यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले व कार्यक्रमाची सुरुवात झाली राजनंदिनी वानोळे, सारिका गायकवाड, सोनल सपकाळ या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व अधक्ष्यानी आपल्या अध्यक्षीय भाषणात मुली शिकणं ही काळाची गरज आहे जर ती शिकली तर बऱ्याच पिढ्या सुशिक्षित होतात त्याचबरोबर आपल्या कुटूंबासोबतच समाजपरिवर्तन होईल त्यासाठी मुलगी शिक्षणासपासून वंचित रहाता कामा नये पुरातन विचारांना विमोड करून समाजामध्ये नवीन रूढी परंपराचे बीज रोवण्याचे काम त्यांनी केले जसे की मुलींचे बालविवाह, सती, केशवपण, विधवा विवाह त्यांनी विरोध केला व याबद्दल समाजप्रबोधन केले व समाजपरिवर्तनाची नांदी हाती घेतली असे गौरऊदगार काढले.यावेळीसौ.रेखा पांडेय, स्वाती दोमाटे, तेजप्रकाश तिवारी वाघमारे खंडू,अमर पांडेय, झळके यादव यावेळी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन सूर्यवंशी राम यांनी तर आभार सय्यद एल. बी .यांनी केले