पणज येथे श्री संत गाडगेबाबांना विनम्र अभिवादन कार्यक्रम संपन्न

पणज येथे श्री संत गाडगेबाबांना विनम्र अभिवादन कार्यक्रम संपन्न
शहर प्रतिनिधी अकोट
देवानंद खिरकर = आकोट तालुक्यातील ग्राम पणज येथील श्री संत गाडगेबाबा मंदिरात रास्टसंत गाडगेबाबा यांच्या 64 व्या पुण्यंतीथी निमीत्ताने संत गाडगेबाबा भागवत समीती व समस्त गावकरी मंडळी पणज कडून
दरवर्षी प्रमाने याही वर्षी विनम्र अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला त्याच बरोबर विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले रविवार दिनांक 20 डिसेंबर 2020 ला सकाळी सर्व प्रथम संत गाडगेबाबा यांच्या प्रतीमेचे व मुतीँचे पुजन हार अर्पण आरती करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले होते यावेळी पणज येथील महालक्ष्मी माता ढोलाचे भजन मंडळाचा भजनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला होता या कार्यक्रमाचे आयोजन संत गाडगेबाबा भागवत समीती व समस्त गावकरी मंडळी पणज यांनी केले होते यावेळी पणज ग्रामस्थांनी व भाविकांनी दर्शन व प्रसादाचा लाभ घेतला संत गाडगेबाबा यांच्या 64 व्या पुण्यंतीथी निमीत्ताने भजन पुजन प्रसाद किर्तन तथा विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले तसेच बुधवार वेश परीसरात गाडगेबाबा पुण्यंतीथी निमित्त ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले यावेळी पणज ग्रामस्थां आणी भाविकांचे सहकार्य लाभले तसेच संत गाडगेबाबा भागवत समीती पदाधिकारी गावकरी भाविक तसेच सर्वांनी एकत्र येऊन श्री संत गाडगेबाबा यांना पुण्यंतीथी निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.