नया अंदूरा गावातील ग्रामपंचायत कार्यालयाचा प्रकार

नया अंदूरा गावातील ग्रामपंचायत कार्यालयाचा प्रकार
बाळापूर तालुका प्रतिनिधी
अंकित क-हे
मो.9579716578
बाळापूर तालूक्यातील ग्राम नया अंदूरा गावातील ग्राम पंचायत कार्यालयाचा कारभार आला समोर गावातील ठिक ठिकाणी गावातील जलवाहिन्या लिकेज असल्यामुळे गावातील मुख्य रस्ते चिखलमय झाले असून सुद्धा ग्राम पंचायत कार्यालय दुर्लक्ष करीत आहेत नया अंदूरा गावातील सरपंच यांचा कार्यकाल जवळपास सहा महिन्यापासून संपल्यानंतर ग्राम पंचायत कार्यालय नया अंदूरा येथे प्रशासकीय अधिकारी नेमले असता ते गावात हजर राहत नाहीत व गावातील समस्या जाऊन घेत नसल्याने तसेच गावात जागोजागी समस्या निर्माण झाल्या आहेत .गावातील ग्राम पंचायत कार्यालयाच्या समोर गेल्या दोन महिन्यापासून तेथील जलवाहिनी लिकेज असल्यानंतर ग्राम पंचायत कार्यालय याकडे दुर्लक्ष करीत आहेत व गावातील लोकांना जलवाहिनी लिकेज असल्यामुळे दुशीत पाण्याचा पुरवठा करून प्यावे लागते त्यामुळे नया अंदूरा गावातील वार्ड क्रमांक 1 मधिल लोकांना दुशीत पाण्याचा पुरवठा करावा लागत आहे .नया अंदूरा गावातील मागिल दोन वर्षापासून असलेल्या समस्या ग्राम पंचायत निवडणूक जवळपास येताच कामे सुरू केले परंतु गावातील काही समस्या अजूनही पेंटींग असल्याचे चित्र दैनिक मातृभूमी वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात आले आहे नया अंदूरा गावातील ग्राम पंचायत कार्यालयाच्या समोरील जलवाहिनी लिकेज तसेच गावातील सांडपाणी थेट जमा झाल्याने तेथे तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे तसेच जिल्हा परिषद शाळेच्या मागिल रस्त्यावर गावातील वार्ड क्रमांक 1 मधिल सांडपाणी थेट रस्त्यावर आल्याने येथील लोकांना जाण्यासाठी किंवा येण्यासाठी त्रास होत आहे .नया अंदूरा गावातील ग्राम पंचायत कार्यालयाची निवडणूक जवळ येताच गावातील रखडलेल्या कामाला वेग आले होते व काही कामे अजूनही पेंटींग असल्याचे दिसून येत आहेत ते कामे लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी व्यक्त केली जात आहे तरी नया अंदूरा गावातील ग्राम पंचायत कार्यालयाचे प्रशासकीय अधिकारी यांनी तातडीने नया अंदूरा गावातील रखडलेले कामे पूर्ण करून द्यावे नया अंदूरा गावातील जागोजागी साचलेले पाणी किंवा ग्राम पंचायत कार्यालयाचे जागोजागी असलेले लिकेज तातडीने काढून गावातील लोकांच्या जिवाला होणारा धोका दुर करावा.नया अंदूरा गावातील आरोग्य सेवक जवळपास दोन तीन महिन्यातून एकदा गावात फेरफटका मारतात व गावात आल्यानंतर संपूर्ण गावातील लोकांची आरोग्य तपासणी करावी व नया अंदूरा गावात आरोग्य सेवक यांनी येऊन वेळोवेळी माहिती व मार्गदर्शन द्यावे अशी मागणी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.तसेच संपूर्ण अकोला जिल्ह्यात कोवीड 19 चा वाढता प्रादुर्भाव पाहता गावात स्वछता ठेवणे गरजेचे आहे परंतु नया अंदूरा गावात जागोजागी दुशीत पाणी साचलेले असल्याने रोगराई पसरण्याची भिती वाटत आहे तरी लवकरात लवकर गावातील समस्या दूर कराव्या अशी माहिती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे