श्री हभप अनिल महाराज पाटील यांनी १०८ दिवसांमध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथाचे १०८ पारायण पूर्ण – ह भ प गुरुवर्य संजयजी महाराज पाचपोर

केवळ सूर्योदय आणि सूर्यास्त एवढ्याच नैसर्गिक सुविधा उपलब्ध असणाऱ्या बाभुळगाव,(ता. बार्शी) या छोट्याशा खेड्यात जन्मलेला वारकरी संप्रदायातील एक हिरा!
सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत विनम्रपणे अध्ययन करून महाराष्ट्रात प्रभावी कीर्तनकार म्हणून नावलौकिक….. वारकरी शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांना भोजनाची व्यवस्था असलेल्या अन्नपूर्णा योजनेत भरीव योगदान…. संस्थेच्या आणि जोग महाराजांच्या पुण्यतिथी शताब्दी महोत्सवात तन-मन-धनाने सर्वस्वी सेवा… त्याचबरोबर अनेक गोशाळांसाठी सुद्धा आर्थिक मदत…
आज संप्रदायाच्या कार्यकर्तृत्वात अनिलमहाराज पाटील यांचा आदर्श घेण्यासारखा आहे. यावर्षी कोरोना सारख्या महामारीमुळे योजलेल्या लॉकडाऊनमध्ये आपत्तीला महाराजांनी संधी बनवले आणि १०८ दिवसांत ज्ञानेश्वरीची १०८ पारायणे पूर्ण केली.
त्यांच्या या अनुष्ठानास विनम्र अभिवादन!🙏💐💐💐 श्री हभप रामायणाचार्य संजयजी महाराज पाचपोर