ताज्या घडामोडी

कोरोना च्या पार्श्वभूमीवर माळेगावची खंडोबा यात्रा रद्द. केवळ देवस्वारी पूजन व मंदिरातील पारंपारिक कार्यक्रम यंदा होणार..

कोरोना च्या पार्श्वभूमीवर माळेगावची खंडोबा यात्रा रद्द. केवळ देवस्वारी पूजन व मंदिरातील पारंपारिक कार्यक्रम यंदा होणार..
मनोज बिरादार देगलूर प्रतिनिधी
मो.9960757871
नांदेड -जिल्ह्यातील संबंध दक्षिण हिंदुस्थानात प्रसिद्ध असलेली माळेगाव यात्रा कोरोना या महामारी मुळे यंदा मात्र एकदम साध्या पद्धतीत साजरी होत आहे. . केवळ पारंपरिक विधी करून पार पडणार असून यावर्षी यात्रा दरवर्षी प्रमाणे भरणार नाही. यात्रेतील कृषी प्रदर्शन पशुप्रदर्शन कुस्त्यांची दंगल व पारंपरिक कला महोत्सव तमाशा फड आदींना परवानगी नाकारण्यात आली असून तसे पत्र जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी माळेगावच्या ग्रामपंचायतीला दिले आहे. दक्षिण हिंदुस्थानात प्रसिद्ध असलेली माळेगावची यात्रा देखील यावर्षी भरणार नसल्याचे स्पष्ट संकेत जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. कर्नाटक उत्तर प्रदेश तेलंगणा आंध्र प्रदेश राजस्थान आदी राज्यातून हजारो व्यवसायिक पशुपालक शेतकरी या यात्रेसाठी जानेवारी महिन्यापासूनच गर्दी करतात. आपले व्यवसाय त्याठिकाणी उभारतात अश्व प्रदर्शन व बाजार हे या यात्रेचे एक वैशिष्ट्य आहे कृषी प्रदर्शन जनावरांचे प्रदर्शन स्पर्धा कुस्त्यांची दंगल व तमाशा फड हे देशभरातील विविध भागातून याठिकाणी येतात. मात्र यावर्षी ही यात्रा भरणार नाही हे स्पष्ट झाले आहे. जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटणकर यांनी यापूर्वी च जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांना पत्र लिहून याबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. जिल्हाधिकारी यांचे पत्र आपणास प्राप्त झाले असून त्याबाबतच्या सूचना आपण संबंधित सर्व पदाधिकारी तसेच माळेगाव ग्रामपंचायत प्रशासनाला दिले आहेत. माळेगाव यात्रेच्या निमित्ताने होणारे परंपरिक पूजन व देव सवारी हे सोशल डिस्टंसिंग चे पालन करून होणार आहे 11 जानेवारी पासून सुरू होणारी ही यात्रा केवळ पारंपरिक कार्यक्रम व विधी करून होणार आहे. यात्रेतील गर्दी टाळण्यासाठी येणाऱ्या सर्व व्यापाऱ्यांनी सूचनांचे पालन करून यात्रेत आपले व्यवसाय सुरू करू नयेत अशा सूचनाही जिल्हा प्रशासनाने दिले आहेत या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन एकंदर कार्यक्रमाची रूपरेषा अंतिम केली जाणार आहे आकाश पाळणे तमाशाचे फड अश्वांची विक्री जनावरांची विक्री प्रदर्शन कुस्त्यांचा फड कला महोत्सव या सर्व कार्यक्रमांना यात्रेतून वगळण्यात येणार आहे अशी सूचनाही दिली गेले आहेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: