ताज्या घडामोडी

छत्रपती शिवाजी महाराज उद्यान अकोट चे सौंदर्यीकरण व्हावे या मागणीसाठी नगरसेवक मनीष कराळे यांचे शिवप्रेमीसह नगरपरिषदेला निवेदन..


देवानंद खिरकर = अकोट शहरातील छ.शिवाजी महाराज चौकातील छ.शिवाजी महाराज उद्यानाचे सौंदर्यीकरणाचे काम लवकरात लवकर काम सुरू व्हावे याकरिता आज दि.१४/डिसें/२०२० ला नगरसेवक तथा शिवसेना गटनेते मनीष रामाभाऊ कराळे यांनी शिवप्रेमींसह अकोट नगरपालिका मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्या नावे निवेदन देऊन मागणी केली आहे.
अकोट शहरातील मुख्य केंद्र असलेल्या छ.शिवाजी महाराज चौकातील छ.शिवाजी महाराज उद्यान हे गेली अनेक वर्षांपासून विविध समस्यांनी ग्रासलेले आहे,शहरातील या मुख्य उद्यानाकडे नगरपरिषद प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.ज्यामुळं आज या उद्यानाची दशा ही अत्यंत दयनीय झालेली आहे.उद्यानाची ही अवस्था पाहता अकोट नगरपरिषदेने या उद्यानाचा आपल्याकडे असलेला सौंदर्यीकरनाबाबतचा प्रस्थावित आराखडा हाती घेऊन तातडीने काम सुरू करावे.यासोबत या उद्यानाचे पावित्र्य जपण्यासाठी नगरपरिषदेने येथे २४ तास सुरक्षारक्षकाची मानधनतत्वावर ठराव घेऊन स्वतः नेमनुक करावी.तसेच उद्यानाच्या आजूबाजूला असलेले अतिक्रमण लवकरात लवकर हटविण्यासाठी अतिक्रमण मोहीम हाती घ्यावी अश्या आशयाचे निवेदन देऊन मागणी केली आहे.यावेळी शिवप्रेमींमध्ये प्रामुख्याने विजय ढेपे मा.शिवसेना उपशहर प्रमुख,ज्ञानेश्वर पाटील मानकर,गणेश कुलट,विजय माहोकार,आकाश कोटेकर यांची उपस्थिती होती.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: