ताज्या घडामोडी

राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे अपंग बांधवांना ब्लँकेटचे वाटप

राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे अपंग बांधवांना ब्लँकेटचे वाटप
शहर प्रतिनिधी अकोट
देवानंद खिरकर -राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे सामाजिक बांधिलकी जोपासत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा माननीय खासदार श्री शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दिनांक 12 डिसेंबर रोजी आकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी कॉंग्रेस चे जिल्हा अध्यक्ष संग्राम गावंडे . राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष शिवा मोहोड यांच्या मार्गदर्शनात तालुक्यातील अपंग बांधवांना ब्लँकेट मोफत वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभा अध्यक्ष नानासाहेब हिंगणकर तर प्रमुख अतिथी म्हणून पुणे येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामप्रभू तराळे राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष कैलास गोंडचर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष तथा या कार्यक्रमाचे आयोजक राम म्हैसने हे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी अपंग बांधवांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे मोफत ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ सहकार नेते नानासाहेब हिंगनकर यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने अपंग बांधवांसाठी माननीय शरद चंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ब्लँकेट चे वितरण केले आहे. एक सामाजिक ऋण फेडण्याचा हा प्रयत्न असून राष्ट्रवादी युवक काँग्रेस सामाजिक बांधिलकी जोपासत असल्याचे मत व्यक्त केले. यावेळेस तालुकाध्यक्ष कैलास गोंडचर तसेच पुणे येथील रामप्रभू तराळे यांनीसुद्धा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तसेच राम म्हैसने यांच्या आयोजनातील या कार्यक्रमा बद्दल प्रशंसा केली. या वेळी राम म्हैसने यांनी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळत असताना जर कोणत्या अडचणी आणि समस्या असतील तर राष्ट्रवादी युवक कांग्रेस अपंग बांधवा साठी पुढाकार घेईल असे त्यांनी यावेळी सांगितले .या कार्यक्रमाला रा. अ. वि. मा. तालुका अध्यक्ष गणेश वाकोडे, विठ्ठल होरे, नरेंद्र कोंडे, गुलाब कात्रे, अनिल राऊत, जब्बार शाहा, आदी सह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विधान सभा अध्यक्ष सतिश हांडे, जयदीप चराटे. शुभम देशमुख ,श्रीकांत साबळे , शिवाजीराव सोनोने , मयूर बरबरे, पवन वानखडे आदी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: