ताज्या घडामोडी

आरोग्य यंत्रणेने नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी-डॉ अशोक ओळंबे


अकोला-कोविड १९ नंतर अकोला जिल्ह्यातील बरेच ठिकाणी डेंगू च्या तापेनी थैमान घातले असून ग्रामीण व शहरी आरोग्य यंत्रनेनी युद्धपातळीवर लक्ष घालुन शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याचा काळजी घ्यावी अशी विनंती डॉ अशोक ओळंबे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी व मनपा,नपा आरोग्य अधिकारी यांचेकडे एका निवेदना द्वारे केली आहे,ज्यामध्ये अकोला शहरालगत असलेले अमानतपुर ताकोडा येथील,दिलेरसिंग भोसले,पदमलाल पवार,आशिष पवार, श्वेता चव्हाण,आयेशा चव्हाण,मायावती भोसले,रेश्मा जनगलसिंग भोसले,गिरीश पवार,व पारधी तांडयावरील इतर जणांना डेंगू ची लागण झाली असून त्यापैकी काहीजण खाजगी रुग्णालयात तर काहीजण सरकारी रुग्णालयात औषोधोपचार घेत आहेत,तसेच शहरी भागात सुध्धा मोठ्या प्रमाणात डेंगू व मलेरियाची लागण होत असल्यामुळे नाल्याची साफसफाई,औषधी फवारणी,मनपा भागातील नियमित स्वच्छतेकडे लक्ष देण्याची गरज असून सध्याचे वातावरण मच्छराना पोषक असून नागरिकांनी आपला परिसर स्वस्छ ठेवून,तुटलेले माठ, निकामी टायर, ज्यामध्ये पाणी साचून रहाते अश्या वस्तूची विल्हेवाट लावून आपला परिसर स्वस्छ ठेवावा. सर्व नागरिकांनी आडवड्यातून एक दिवस पााण्याची भांडी रीकामी ठेउन कोरडा दिवस पाळावा असे आव्हान डॉ अशोक ओळंबे यांनी जिल्हातील नागरिकांना केले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: