ताज्या घडामोडी

तेल्हारा ते हिवखेड रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करा मनविसे चे उपविभागीय अभीयंत्याना निवेदन

तेल्हारा ते हिवखेड रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करा मनविसे चे उपविभागीय अभीयंत्याना निवेदन
शहर प्रतिनिधी अकोट.
देवानंद खिरकर =तेल्हारा ते हिवरखेड या रस्त्याचे काम हे २०१९ पासून सुरु असून हा रस्ता अजून पूर्ण न झाल्या मुळे या रस्त्यावर दररोज किरकोळ प्रकार चे अपघात घडत आहे.दि.१/१२/२०२० रोजी एक मुलगा व त्याची आई या रस्त्यावरुन दुचाकी ने जात असतांना त्यांच्या दुचाकाचा अपघात घडला असुन त्या मुलाच्या आईचा रस्त्यामूळे मृत्यू झाला.म्हणून या रस्त्यावर जर असेच अपघात घडत राहले व लोक असेच मृत्यूमूखी पडत राहले तर या रस्त्याचे काय कराचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.म्हणून आज मनविसे च्या वतीने उपविभागीय अभीयंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन देऊन १५ दिवसाच्या आत काम जलग गती ने न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेना तिव्र आंदोलन करेल असा इशारा सुध्दा देण्यात आला.
सदर निवेदन हे मनसे अकोला जिल्हा अध्यक्ष रविंद्र फाटे व मनविसे विभागीय चिटणीस अॕड.श्रीरंग तट्टे यांच्या मार्गदर्शनात.मनविसेचे शशांक कासवे व मनविसे तेल्हारा तालूका अध्यक्ष कुशल देव यांच्या नेतृत्वात देण्यात आले.या प्रसंगी विलास लाजुरकर,महेश सिसोदीया ,मंगेश लोळे ,मंगेश खुमकर,अब्दूल जावेद,अंकित खुमकर,गौरव टोहरे,प्रितम पारिसकर,शरद कुयटे,अजय ठाकुर,आकाश अरुडकर,गोलू कुयटे,रोहीत ठाकुर,आकाश अरुडकर,करण ठाकुर,चंद्रकात मोडोकार,बजरंग कुयटे व असंख कार्यकर्ते उपस्थित होते अशी माहीती मनविसे प्रसिद्धी प्रमुख अजय शर्मा यांनी दिली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: