वंचित बहुजन आघाडी तेल्हारा तर्फे नगर परिषद वर धडक मोर्चा

गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा:- तेल्हारा नगर परिषद वर टांगले बेशरम चे तोरण मोर्च्यामध्ये प्रमुख मागण्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करणे!
मिलिंद नगर, भीम नगर, पंचशील नगर, इंदिरानगर, सिद्धार्थ नगर, लुंबिनी नगरव छत्रपती शाहू महाराज नगर येथे युवकांच्या साठी स्वतंत्र जिम उपलब्ध करून देणे व त्याठिकाणी सामाजिक सभागृह बांधणे व हायमास्ट लाईट उभारणे अशा प्रकारच्या प्रमुख मागण्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धडक मोर्चामध्ये करण्यात आल्या नगर परिषद वर बेशरम चे तोरण बांधुन नगर परिषदेचा जाहिर निषेध करण्यात आला त्यावेळी उपस्थित राजेंद्र पातोडे प्रदेश महासचिव वंचित बहुजन आघाडी तथा प्रदेश प्रवक्ते, प्रमोद भाऊ देंडवे जिल्हा सचिव वंचित बहुजन आघाडी, सचिन शिराळे प्रसिद्धीप्रमुख, नरेंद्र बेलसरे जिल्हा नेते, विकास पवार शहराध्यक्ष,अशोक दारोकार महासचिव तेल्हारा तालुका, पद्माताई गवारगुरु तालुका अध्यक्षा महिला आघाडी, कल्पना हिवराळे शहराध्यकक्षा महिला आघाडी, धीरज वरठे मा अध्यक्ष, सैफुल्ला पणन, महासचिव, आदी कार्यकर्ते उपस्थित होते