ताज्या घडामोडी

मुखेड येथे पदवीधर मतदाराचा मेळावा


संग्राम पाटील तांदळीकर
मुखेड तालुका प्रतिनिधी

पदवीधर मतदारांचा मुखेडात भाजपकडून भव्य मेळावा.
देशाचे नेतृत्व एका खंबीर हातात असून त्या नेतृत्वावर व भारतीय जनता पक्षावर देशातील नागरिकांनी विश्वास टाकला आहे तो विश्वास दिवसेंदिवस दृढ होत चालला असून आगामी पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार शिरीष भास्करराव बोराळकर यांना विजयी करण्याचे आवाहन खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी मुखेड येथे आयोजित पदवीधरांच्या मेळाव्यात केले.
यावेळी आमदार डॉ.तुषार राठोड या भागाचे ज्येष्ठ नेते श्रीराम पाटील राजूरकर, व्यंकटराव पाटील चांडोळकर,माधवअन्ना साठे, गौतमराव काळे, लक्ष्मण पाटील खैरकेकर,मनोज गोंड, चंद्रकांत गरुडकर,नारायण गायकवाड, नासेर पठाण,रणजीत पाटील हंगरगेकर, माजी नगराध्यक्ष गणपत गायकवाड, डॉ.माधव पाटील उच्चेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पदवीधर मतदारांना मार्गदर्शन करताना खा. प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले, मागच्या निवडणुकीत दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांनी शिरीष बोराळकर हे विजयी व्हावेत त्यांची इच्छा होती. मात्र ऐनवेळी काळाने घाला घातला व गोपीनाथराव मुंडे आपल्यातून निघून गेले.आता त्यांच्या पश्चात त्यांना खरी श्रद्धांजली देण्यासाठी आपण शिरीष बोराळकर यांना पदवीधर मतदारसंघातून विजय करू तसेच पदवीधर मतदारांनी मतदान करताना शिरीष बोराळकर यांना आपल्या पहिल्या पसंतीचे मत देऊन त्यांचा विजय निश्चित करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी बोलताना आ. डॉ. तुषार राठोड म्हणाले निवडणुकीत शिरिष बोराळकर यांना मुखेड तालुक्यातील सर्वाधिक मतदान मिळाले होते. केवळ काही मतांच्या फरकाने शिरीष बोराळकर यांचा विजय हुकला होता. या विजयाच्या हुलकावणीला मतदारांची चुकीची मतदान पद्धती ही कारणीभूत ठरली होती. यावेळी मतदान करताना काळजीपूर्वक शिरीष बोराळकर यांना पहिल्या पसंतीचे मतदान करून त्यांचा विजय निश्चित करा. असे आवाहन त्यांनी यावेळी पदवीधर मतदारांना केले. तसेच मागील दोन वेळा पदवीधरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आ. सतीश चव्हाण यांनी सरकार दरबारी पदवीधरांचे किती प्रश्न मांडले असाही सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
यावेळी मोठ्या संख्येने विविध शैक्षणिक संस्थेचे कर्मचारी व पदवीधर मतदार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.रामकृष्ण बदने यांनी केले तर प्रास्ताविक डॉ. वीरभद्र हिमगिरे यांनी मांडले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: