ताज्या घडामोडी
गोदावरी मनार पब्लिक स्कूल ची कु.रोहिणी दोमाटे ही वैद्यकीय प्रवेशास पात्र

शामसुंदर जाधव रामतिर्थ सर्कल प्रतिनिधी
शंकरनगर – येथील गोदावरी मनार पब्लिक स्कूल, शंकरनगर नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेतील विद्यार्थिनी कु.रोहिणी संजय दोमाटे ही एम. बी.बी.एस. साठी पात्र झाली. विशेष म्हणजे ही एल.के.जी.पासून बारावी पर्यंत येथेच हिचे शिक्षण पूर्ण झाले निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.खा.श्री .भास्कररावजी पाटील खतगावकर, उपाध्यक्ष श्री.मधूकररावजी पाटील खतगावकर, श्री.बाळासाहेब पाटील खतगावकर, सचिव डॉक्टर मीनल निरंजन पाटील खतगावकर,(जि. प.सदस्या नांदेड) प्राचार्य डी. पी.पांडेय , रेखा पांडेय, स्वाती दोमाटे, तेजप्रकाश तिवारी, सुनील दुबे, सय्यद एल.बी. सूर्यवंशी आर के तसेच शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Shortlink http://punyabhuminews.co.in/?p=1387