ताज्या घडामोडी

बस स्टँड ते आय टी आय रस्ता रुंदीकरणासह कॉंक्रिटीकरण करा अरुंद रस्त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास


*


  • प्रतीनिधी
    पवन ठाकरे
    नांदगाव खंडेश्वर

अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुका वर्षानुवर्षे दुर्लक्षीत असल्यामुळे या तालुक्याची ओळख मागासलेला तालुका म्हणून केली जाते. कारण या तालुक्यात चांगल्या नेतृत्वाचा अभाव असल्यामुळे याकडे या विभागाच्या लोकप्रतिनिधींचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने नांदगाव शहरासह हा तालुका सुद्धा विकासापासून वंचीत आहे.

त्यामुळे या भागातील लोकप्रतिनिधींनी,आणि या विभागाचे खासदार,आमदार,यांनी या प्रश्नांकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे. गेल्या काही वर्षांपासून नांदगाव खंडेश्वर शहरातील बस स्टँड ते चांदुर रेल्वे मार्गातील वाहतूक कोंडीने वाहनचालक तसेच या भागातील नागरिक बेजार झाले आहेत.

या रस्तावर दिवसेंदिवस मार्केटचे प्रमाण वाढत असल्याने दुकानदार हे आपल्या दुकानाचे बोर्ड रस्त्यावर ठेवत आहेत तसेच या रस्त्यावर ऑटो,तीन चाकी रिक्षा, या रस्त्यावर उभे राहत असल्याने हा रस्ता अरुंद झाला असून यामुळे सगळ्यांच्याच अडचणी वाढल्या आहेत. काहीही करा पण इथली कोंडी फोडा, अशी मागणी या रस्त्यावरून येणारे- जाणारे प्रवाशी करीत.आहेत

या शहरातील वाहतूकीचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत असून, त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. नांदगाव बस स्टँड ते आय टी आय कॉलेज पर्यंत मार्केटचे प्रमाण वाढले असल्याने दररोज सकाळपासून रात्री दहापर्यंत या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होते.यामुळे या रस्त्यावर प्रचंड वर्दळ असते यामुळे या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढले आहेत.

तसेच या रस्त्याने नांदगाव शहरातील ग्रामिण रुग्णालय, पोलिस स्टेशन, श्री क्षेत्र खंडेश्वर मंदिर, आय टी आय कॉलेज, आठवडी बाजार व शहरातील मुख्य स्मशानभुमी याच रस्त्यावर असून हा रस्ता चादुर रेल्वे जाणारा मुख्य रस्ता आहे. हा रस्ता नांदगाव खंडेश्वर शहरासह तालुक्यासाठी महत्वपुर्ण आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन जाणारे भाजीपाल्याचे ट्रक, टेम्पो, पिकअप ही वाहने चांदुर रोडकडून जातात.

हा रस्ता अरुंद आहेच शिवाय रस्त्यावर दोन चाकी – चार चाकी वाहने उभी असतात. त्यातच ‌रिक्षा आणि टॅक्सी स्टॅन्डवरील वाहनांच्या गर्दीमुळे येथील वाहतूक समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे वाहनधारकांमध्ये वादविवाद, कट मारणे, समोरून येणारे वाहन सरळ अंगावर येणे, लहान मोठे अपघात यांसारखे प्रकार नित्य घडतात. त्यामुळे बस स्टँड ते आय टी आय कॉलेज पर्यंतच्या रोडचे रुंदीकरण करून कॉंक्रिटीकरण करण्याची मागणी नांदगावकरांकडून केली जात आहे.

हा रस्ता सा.बा.विभागाच्या अखत्यारीत येत असून याकडे त्यांचे कोणत्याही प्रकारचे लक्ष नसल्याने या विभागाविषयी तीव्र असंतोष दिसून येत आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने या रस्त्यावरून वाहन चालविणे कठीण झाले आहे. याकडे या विभागाचे खासदार, आमदार यांचे सुद्धा कोणत्याही प्रकारचे लक्ष नसून त्यांना नांदगावशी काही देणेघेणे नसल्याचे दिसून येत आहे.

गेल्या एक वर्षापूर्वी या विभागाणे या रस्त्याचे रुंदीकरण, काँक्रिटीकरण,करणे व बस स्थानकापासून खंडेश्वर मंदिरापर्यंत रोडच्या मध्यभागी दुभाजक लावण्या बाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याचे समजते ? याबाबत त्यांनी या रस्त्याचे मोजमापसुद्धा केले असल्याचे या रस्त्यावरील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. परंतु त्यावर अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याने हा रस्ता एखाद्या गाव खेडयापेक्षाही बेकार झालेला आहे.

याकडे या विभागाच्या खासदार व आमदाराचे कोणत्याही प्रकारचे लक्ष नसल्याने त्यांच्याविषयी सुद्धा नांदगावात संताप व्यक्त करण्यात येत आहे. खासदार,आमदार फक्त अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन फक्त प्रसिद्धी मिळविणे यामध्येच दंग असल्याचे दिसते ,

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: