ताज्या घडामोडी

नांदेड जिल्ह्यातील उद्या शाळा सुरू होणार नाहीतशाळा उघडण्याचा निर्णय 30 नोव्हेंबर पर्यंत स्थगित.

मनोज बिरादार देगलूर प्रतिनिधी मो.9960757871

                          

जिल्ह्यातील कोविडची स्थिती, त्यादृष्टीने शाळा सुरू करताना करावयाचे नियोजन आणि शिक्षकांच्या rt-pcr चाचण्या आणि त्याचे निकाल येण्यासाठी लागणारा वेळ या बाबी लक्षात घेऊन जिल्ह्यातील इयत्ता नववी ते बारावीच्या दिनांक 23 नोव्हेंबर रोजी सुरु होणाऱ्या शाळा आता 30 नोव्हेंबर पर्यंत स्थगित करण्यात आल्या असून 1 डिसेंबर नंतर कोविडची स्थिती लक्षात घेऊन शाळा सुरू करण्याचे ठरविण्यात येईल असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
देशभरातील कोविड स्थितीमुळे सन् 2020-21या शैक्षणिक वर्षात प्रत्यक्ष शाळा सुरू करता आल्या नव्हत्या. इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग दिनांक 23 नोव्हेंबर रोजी सुरू करण्याचे प्रस्तावित होते. जिल्ह्यातील कोविडची स्थिती, त्यादृष्टीने शाळा सुरू करताना करावयाचे नियोजन आणि शिक्षकांच्या rt-pcr चाचण्या आणि त्याचे निकाल येण्यासाठी लागणारा वेळ या बाबी लक्षात घेऊन जिल्ह्यातील इयत्ता नववी ते बारावीच्या दिनांक 23 नोव्हेंबर रोजी सुरु होणाऱ्या शाळा आता 30 नोव्हेंबर पर्यंत स्थगित करण्यात आल्या असून 1 डिसेंबर नंतर कोविडची स्थिती लक्षात घेऊन शाळा सुरू करण्याचे ठरविण्यात येईल असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
देशभरातील कोविड स्थितीमुळे सन् 2020-21या शैक्षणिक वर्षात प्रत्यक्ष शाळा सुरू करता आल्या नव्हत्या. इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग दिनांक 23 नोव्हेंबर रोजी सुरू करण्याचे प्रस्तावित होते. नांदेड जिल्ह्यात इयत्ता नववी ते बारावीच्या 858 शाळा असून त्यात जिल्हा परिषदेच्या 70 शाळा आहेत .इयत्ता नववी ते बारावीला शिकवणारे जिल्हा परिषद व खाजगी शाळांचे असे एकूण 8115 शिक्षक आहेत. शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व शिक्षकांची rt-pcr चाचणी करून घेण्यासाठी नियोजन करण्यात आले. शिक्षकांचे नाव ,त्यांची तपासणी तारीख व ठिकाण निश्चित करून अशा याद्या महानगरपालिका व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे देण्यात आल्या होत्या.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर -घुगे यांनी शाळारंभाची पूर्वतयारी यासंदर्भाने डायटचे प्राचार्य, शिक्षणाधिकारी प्राथमिक, शिक्षणाधिकारी माध्यमिक आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन स्थिती जाणून घेतली. प्राथमिकचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर,माध्यमिकचे शिक्षणाधिकारी बी आर कुंडगीर आणि डायटचे प्राचार्य रवींद्र आंबेकर यांनी शाळा सुरू करण्याच्या पूर्वतयारीबाबत माहिती दिली. शिक्षण समितीच्या सभेतही शिक्षण सभापती श्री संजय बेळगे यांनी शाळा सुरू करण्याच्या पूर्वतयारीबाबत सूचना केल्या होत्या.
ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घेण्यासाठी तसेच जे शिक्षक antigen टेस्टमध्ये निगेटिव्ह आलेले आहेत किंवा त्यामधील सेन्टेन्स असूनही निगेटिव आलेले आहेत अशा लोकांची rt-pcr टेस्टिंग करणे तसेच ज्यांची rt-pcr टेस्टिंग झालेली आहे त्यांचे टेस्ट रिपोर्ट प्राप्त करणे यासाठी संपूर्ण तपासणीचा अहवाल येणे आवश्यक आहे ही बाब लक्षात घेऊन शाळा सुरू करणे बाबत दिनांक 2 डिसेंबर सोमवार पर्यंत निर्णय स्थानिक प्रशासनाकडून कळविण्यात येईल.
दरम्यान जिल्ह्यातील 2282 शिक्षकांची एंटीजन टेस्ट करण्यात आली असून 4982 शिक्षकांची तपासणी करणे सुरू आहे. यापैकी 927 जणांची rt-pcr चाचणी केली आहे .2702 जणांची चाचणी सुरू आहे. आतापर्यंत 40 टक्के शिक्षकांची तपासणी पूर्ण झाली आहे. उर्वरित तपासणी करून घेण्यात येत आहे.
1 डिसेंबरनंतर सर्व स्थितीचे अवलोकन करुन शाळा सुरू करण्याचे ठरविण्यात येईल असे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, सभापती संजय बेळगे, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी सांगितले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: